वृक्ष लागवडीबरोबरच संवर्धन करा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

0

सोलापूर, दि.15: पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्व नागरिकांनी माझी वसुंधरा या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

सोलापूर महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंदरा ‘अभियानांतर्गत एक लाख वृक्ष लागवड मोहिमेमध्ये केगाव येथील 43 एकर जागेवर ऑक्सीजन पार्क उभारण्यात येणार आहे. याठिकाणी 20 हजार वृक्ष लागवड करण्यात येणार असून या मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, मनपातील विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पि. शिवशंकर, गटनेते चेतन नरोटे, गटनेते आनंद चंदनशिवे, उपायुक्त धनराज पांडे, नगरसेवक गणेश पुजारी आदी उपस्थित होते.

पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी शासनाने माझी वसुंधरा अभियान राज्यात राबविण्यास सुरुवात केली आहे. माझी वसुंधरा अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी व युवकांनी सहभागी व्हावे. माझी वसुंधरा अधिकाधिक संपन्न होण्यासाठी प्रयत्न करावेत. या योजनेत निधीसाठी प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावास नगरोत्थानमधून एक कोटी रुपयाचा निधी पहिल्या टप्प्यात देण्यात येईल, असेही पालकमंत्री भरणे यांनी यावेळी सांगितले. वृक्ष लागवडीबरोबरच संवर्धन करा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या