आपदा मित्र सखींनी सिद्धेश्वर तलावात केला बोट चालविण्याचा सराव

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500000

सोलापूर : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने सिद्धेश्वर तलाव येथे आपदा मित्र सखींना बोट चालवण्याचा सराव घेण्यात आला. आपत्तीजनक परिस्थितीत बचाव कार्यासाठी बोट महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे सातत्यपूर्ण सरावातून गुणवत्तापूर्ण कामगिरी साध्य होऊन बचाव कार्य अधिक प्रभावीपणे करता येईल, असा उद्देश या उपक्रमामागे आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिशागर ढोले यांनी दिली.

सामाजिक बांधिलकीतून चडचणकर पेट्रोल पंपाचे योगेश चडचणकर यांनी सरावासाठी लागणारे पेट्रोल उपलब्ध करून दिले. त्यामुळे सराव कार्य सुरळीत पार पडले. आपत्तीकाळात मानवहानी टाळण्यासाठी वारंवार सराव शिबिरांचे आयोजन होणे गरजेचे असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले. तसेच आपदा मित्र सखी टीमच्या वतीने सरावासाठी लागणारे पेट्रोल सामाजिक बांधिलकीतून दानशूर व्यक्तींनी उपलब्ध करून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.500000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या