परभणीमदतमहाराष्ट्र

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी दोन लाखांचा धनादेश जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द

सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, इरा कन्स्ट्रक्शनतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान

B1न्यूज मराठी नेटवर्क350

परभणी, दि. २५ : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्स व इरा कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

सदर मदत मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांच्याकडे महापौर सय्यद इकबाल, सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे शेख अबूबकर भाईजान, हाजी शोएब शेख अबूबकर, अब्दुल रजाक शेख अबूबकर, पठाण बिस्मिल्ला खान यांच्या हस्ते धनादेशाद्वारे सुपूर्द करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपस्थित होत्या.350जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आधार मिळावा आणि त्यांच्या मदतीसाठी समाजातील विविध घटकांनी पुढाकार घ्यावा, या भावनेतून ही आर्थिक मदत देण्यात आली.350

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button