जयंतीबार्शीमहाराष्ट्र

गुरुनानक जयंतीनिमित्त सुयश विद्यालयात इयत्ता आठवीची बालसभा उत्साहात संपन्न!

B1न्यूज मराठी नेटवर्क350

बार्शी : शीख धर्माचे संस्थापक व थोर संत गुरुनानक महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुयश विद्यालयात इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची विशेष बालसभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या बालसभेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुरुनानक महाराज यांच्या जीवनकार्याची, विचारांची आणि मानवतावादी शिकवणुकीची माहिती देण्यात आली.

इयत्ता आठवीच्या रायगड, राजगड व शिवनेरी या तीन तुकड्यांतील विद्यार्थ्यांनी बालसभेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी भाषणे व मनोगतांच्या माध्यमातून गुरुनानक महाराज यांचे जीवनकार्य, सामाजिक योगदान तसेच समानता, बंधुभाव, मानवता, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव या मूल्यांचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.350बालसभेचे अध्यक्षस्थान प्रथमेश कुंभार याने भूषविले, तर अनुष्का मारकड व आयान गडकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग घेतला. बालसभेचे सूत्रसंचालन तनुजा पिसाळ व तनुजा शिंदे यांनी केले. ओमराजे शिंदे, आरव गादेकर, प्रेम आपुने, कौस्तुभ पवार, जान्हवी मोरे, श्रुती पाटील, दुर्वा कदम, तमन्ना सय्यद, श्रावणी देवकते, श्रावणी माने, युवराज सुतार, श्लोक मुळे, प्रतीक कदम, आरुष मोरे व प्रणव शिंदे यांनी गुरुनानक महाराज यांच्या जीवनकार्यावर मनोगते व्यक्त केली. अपूर्वा गायकवाड हिने प्रास्ताविक केले, तर पृथ्वीराज लंगोटे याने आभार मानले.350विद्यालयाचे संस्थापक शिवदास नलावडे, मुख्याध्यापक गणेश मोरे व उपमुख्याध्यापक सोमनाथ पवार यांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे, वक्तृत्वाचे व सादरीकरणाचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.

या बालसभेच्या यशस्वी आयोजनासाठी इयत्ता आठवीच्या रायगड, राजगड व शिवनेरी या तिन्ही तुकड्यांचे वर्गशिक्षक वाघे सर, श्रीमती माने मॅडम व सारंग सर यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्यातील वक्तृत्वकला, आत्मविश्वास व नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन यामुळे ही बालसभा ज्ञानवर्धक, प्रेरणादायी व संस्मरणीय ठरली.350

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button