प्राईम कॉम्प्युटर्सची विभागीय बैठकीत दमदार कामगिरी; पाच पुरस्कारांनी सन्मानित!

एआय शिक्षण, एमएस सीआयटी, क्लिक अभ्यासक्रम आणि शिक्षक प्रशिक्षणातील योगदानाची दखल; जिल्ह्यासह राज्यस्तरावरही ठसा
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : संगणक शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गेल्या २७ वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बार्शीतील प्राईम कॉम्प्युटर्सने आपल्या यशाची परंपरा कायम राखत आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) आणि डीसीयू सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने २० नोव्हेंबर रोजी सोलापूर येथे आयोजित वार्षिक विभागीय बैठक २०२६ मध्ये प्राईम कॉम्प्युटर्सला तब्बल पाच पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
या पुरस्कारांमध्ये क्लिक अर्बन ॲडमिशन स्टार परफॉर्मरमध्ये जिल्ह्यात द्वितीय क्रमांक, एआय मास्टरक्लास रजिस्ट्रेशन एक्सलन्समध्ये जिल्ह्यात द्वितीय व राज्यात सातवा क्रमांक, तसेच एमएस-सीआयटी लर्नर टेस्टिमोनियल २०२६ मध्ये जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळवला. याशिवाय एआय आधारित सोशल मीडिया मार्केटिंग प्रमोशन आणि स्कूल टीचर ट्रेनिंगमधील उत्कृष्ट योगदानाबद्दल तसेच बेस्ट स्कूल आऊटरीच टीचर्स डे सेलिब्रेशन या विशेष पुरस्कारांनीही संस्थेला सन्मानित करण्यात आले.
सोलापूर येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात एमकेसीएलचे सीनियर जनरल मॅनेजर अतुल पटोडी, रिजनल मॅनेजर महेश पत्रिके, अमित रानडे, अश्वत्थ कॉम्प्युटरचे समन्वयक जेऊरकर आदी मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे संचालक संतोषकुमार कोल्हे आणि अनुराधा कोल्हे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
१९ ऑगस्ट रोजी स्थापना झालेल्या प्राईम कॉम्प्युटर्सने संचालक संतोषकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या २७ वर्षांत संगणक शिक्षण, डिजिटल कौशल्य विकास आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षणाच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. संस्थेमार्फत एमकेसीएलचे एमएस-सीआयटी व क्लिक अभ्यासक्रम, संगणक हार्डवेअर-सॉफ्टवेअर, आयटी हार्डवेअर आणि नेटवर्किंग यांसह विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते.
विशेष म्हणजे, बदलत्या तंत्रज्ञानाची गरज ओळखून संस्थेने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) शिक्षणावरही विशेष भर दिला आहे. चॅटजीपीटी, गुगल जेमिनी, क्लॉड, नोटबुक एलएम, कॅनव्हा आणि मायक्रोसॉफ्ट कोपायलट यांसारख्या आधुनिक एआय साधनांचा शैक्षणिक वापर, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, एआय फॉर टीचर्स आणि एआय सेफ्टी या विषयांवर शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद आणि खासगी शाळांमधील सुमारे एक हजार शिक्षकांपर्यंत एआय प्रशिक्षणाचा उपक्रम पोहोचविण्यात संस्थेला यश आले आहे.
पारंपरिक संगणक शिक्षणापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आयओटी आणि रोबोटिक्ससारख्या आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सक्षम करण्याचा प्राईम कॉम्प्युटर्सचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच संस्थेच्या कार्याची विभागीय स्तरावर दखल घेत एकाच वेळी पाच पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
बार्शीच्या शैक्षणिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी ही निश्चितच अभिमानास्पद बाब असून, प्राईम कॉम्प्युटर्सच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून संचालक संतोषकुमार कोल्हे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.




