कृषीमहाराष्ट्रसोलापूर

हिरव्या उसापासून दर्जेदार ‘मुरघास’ तयार करा; जनावरांच्या पोषणासाठी चारा टंचाईवर मात करा – कृषी व पशुसंवर्धन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क350

सोलापूर, दि. २३ : सध्या जिल्ह्यात ऊस तोडणी आणि गाळप हंगाम सुरू असून, ऊस तोडणीनंतर शेतात मोठ्या प्रमाणात हिरवे ऊस वाडे उपलब्ध होतात. अनेकदा हे वाडे वाया जातात किंवा जाळून टाकले जातात. मात्र, या हिरव्या ऊस व उसाच्या वाड्यांवर योग्य प्रक्रिया करून त्यापासून उत्कृष्ट प्रतीचा ‘मुरघास’ (सायलेज) तयार केल्यास उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या चारा टंचाईवर सहज मात करता येऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील पशुपालक आणि शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात ऊस वाड्यापासून मुरघास तयार करून त्याचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.350मुरघास तयार करण्याचे फायदे : हिरवा ऊस व उसाच्या वाड्यातील सर्व पोषक घटक मुरघासमध्ये टिकून राहतात. त्यामुळे दुधाळ जनावरांच्या दूध उत्पादनात आणि फॅटमध्ये चांगली वाढ होण्यास मदत होते. उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची तीव्र टंचाई असताना मुरघास जनावरांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. तसेच, चारा टंचाईच्या काळात महागडा चारा विकत घेण्याचा खर्च कमी होतो आणि ऊस वाड्याचा योग्य वापर होतो. मुरघास तयार करून त्याची साठवण केल्यास वर्षभर चांगला चारा उपलब्ध राहू शकतो.350मुरघास कसा तयार करावा? हिरवे ऊस व ऊस वाडे कुट्टी यंत्राच्या (ट्रॅक्टर संचालित कडबा कुट्टी मशीन) साहाय्याने बारीक करून घ्यावेत. त्यानंतर कुट्टी मिक्सिंग करण्यासाठी पाणी सहज जाणार नाही अशा ठिकाणी जमिनीवर ३ ते ४ फूट उंच वडग्यासारखा आकार देऊन मुरघास तयार करण्यासाठी जागा निश्चित करावी. खड्डा तयार करण्यासाठी ट्रॅक्टर किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने कुट्टी भराव्यास मदत होते. कुट्टी भरल्यानंतर त्यामध्ये ५०० मायक्रॉनची प्लास्टिक शीट अंथरून घ्यावी. त्यावर कुट्टीचा थर टाकून पायाने किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने दाबून हवा बाहेर काढावी. कुट्टीचा आकार निमुळता ठेवावा. त्यानंतर वरून कुट्टी चांगल्या पद्धतीने झाकून घ्यावी.350कुट्टीच्या ढिगावर साधारण दोन फूट मातीचा थर लावून ढिगाची असावी तशी ताडपत्रीवर उचकटून ठेवू नये. कुट्टी तयार करताना हवाबंद पद्धतीने साठवण करणे महत्त्वाचे आहे. मुरघास तयार होण्यासाठी साधारण ४५ ते ६० दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर हा मुरघास जनावरांना खाऊ घालण्यासाठी तयार होतो.

शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपल्या दुग्धव्यवसायाला अधिक फायदेशीर बनवावे. अधिक माहिती व तांत्रिक मार्गदर्शनासाठी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी किंवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

– डॉ. अनिल संजीवर तांबे
जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, सोलापूर
350

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button