बार्शीमहाराष्ट्र

कर्मवीर प्रेरणा या पुस्तकातून कार्यप्रेरणेचा धागा दृढ होईल : प्रा. श्रीहरी वेदपाठक

प्रा.डॉ. राहुल पालके लिखित कर्मवीर प्रेरणा पुस्तकाचा सोलापूर विद्यापीठात सन्मान

B1न्यूज मराठी नेटवर्क500000

बार्शी : सामाजिक जाणीव प्रगल्भ होण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकासाची धारणा दृढ व्हावी लागते. उत्तम ग्रंथ वाचनातून व्यक्तिमत्व विकास होतो. डॉ. राहुल पालके लिखित कर्मवीर प्रेरणा या पुस्तकातून समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या व्यक्तिमत्वांचा परिचय होतो. कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले. त्यांनी शैक्षणिक, सामाजिक व आरोग्य क्षेत्रात दिलेले योगदान चिरंतन प्रेरणादायी आहे.

कर्मवीर प्रेरणा या पुस्तकातून कार्यप्रेरणेचा धागा दृढ होईल, असे मत प्रा. श्रीहरी वेदपाठक यांनी मांडले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्राच्यावतीने डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात प्रा. वेदपाठक बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर होते.

यावेळी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, माजी आमदार धनाजी साठे, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शीचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, खजिनदार जयकुमार शिताळे, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, डॉ. अनिल घनवट, प्राचार्य ए.बी. शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी कर्मवीर प्रेरणा या पुस्तकाचा सोलापूर विद्यापीठाकडून सन्मान करण्यात आला.50000कर्मवीर प्रेरणा या पुस्तकातून कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे समाजगौरव परिवर्तन पुरस्कार्थींचे कार्य योगदानाचा आढावा घेतलेला आहे. क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड ते डॉ.प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या जीवनकार्याचा परिचय वाचकांना प्रेरित करतो. कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या कार्यसंस्कृतीशी पूरक व्यक्तिमत्वांची ओळख कर्मवीर परंपरा प्रगल्भ करते. त्यातून सामाजिक विकासाचा मूलमंत्र अधोरेखित होतो.

या पुस्तकात जगदाळे मामांच्या कार्याची समकालीन उपयुक्तता प्रस्तुत होते. या पुस्तकातील रेखाटलेल्या व्यक्तिमत्वांच्या परिचयातून सामाजिक परिवर्तनाचा मूलमंत्र समाजापर्यंत पोहचेल, असे मत डॉ. पालके यांनी व्यक्त केले. याप्रसंगी विद्यापीठातील मान्यवर, प्राचार्य, प्रा.शशिकांत गायकवाड, प्रा. समाधान पवार, प्राध्यापक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.500000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button