जाती धर्मात फुट पाडुन मत विभागणी करणाऱ्यांना आगामी निवडणुकीत त्यांची जागा दाखवा :- आ. प्रणिती शिंदे

0

सोलापूर | प्रभाग क्रमांक 8 शुक्रवार पेठ बुज़ुर्गवली हॉल येथे आमदार प्रणिती शिंदे व मान्यवरांच्या उपस्थितीत “काँग्रेस मनामनात काँग्रेस घराघरात” या अभियानाचे आयोजन युवा नेते सोहेल कुरेशी यांनी केले होते.
यावेळी शहर अध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार, माजी महापौर आरिफ शेख, नगरसेवक हाजी तौफ़ीक़ हत्तुरे, शकील मौलवी, जाबिर अल्लोळी, अंबादास बाबा करगुळे, जुबेर कुरेशी, सादिक कुरेशी, याकूब मंगलगिरी, बिट्टो कुरेशी, शोहेब महागामी, सैफन शेख, वाहिद बिजापुरे, सोहेल शेख, तिरुपती परकीपंडला, योगेश मार्गम, राहुल वर्धा, सुशील बंदपट्टे, उपेंद्र ठाकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, देश स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोस्तव साजरा करत असताना आज जाती धर्मात फुट पाडुन मते घेऊन सत्तेवर येत आहेत हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे. देश स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्व जाती धर्माच्या स्वातंत्र्यसैनिकानी लढा दिला, बलिदान दिले. जातीच्या नावाने मते मागणारे काम करु शकत नाहीत. आपल्या अडचणीच्या वेळी गड़प होतात. फक्त जातीच्या नावाने भावना भड़काविन्याचे काम करत, मतविभागणी करत आपली राजकीय पोळी भाजून घेतात. त्याचा थेट फायदा भाजपाला होतो. काँग्रेस पक्ष हा सर्वधर्म समभाव माननारा पक्ष आहे. काँग्रेस सर्वसामान्य नागरिकांचा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाला साथ दया तुमचे सर्व प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न काँग्रेस पक्ष निश्चितच करेल.यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या