बार्शी

आयुष्यात कधीही दारु न पिणाऱ्या व्यक्तींचा सन्मान

बार्शी तालुका प्रतिनिधी / किरण खुरंगळे

बार्शी | गौडगाव येथे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ज्या व्यक्तीने आयुष्यात कधीही दारू न पिणाऱ्या २५ ग्रामस्थांना गौडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. उल्हासनगर महानगरपालिकेचे मुख्य लेखाधिकारी मा. विकास चव्हाण साहेब व गौडगांवचे सरपंच सौ. स्वाती बालाजी पैकेकर यांच्या उपस्थितीत दारू न पिणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
या वेळी व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्रातील डॉ. मृणालिनी मोरे, सामाजिक कार्यकर्ते राहुल भड, ग्रामपंचायत सदस्य नागेश काजळे, सुशांत सुरवसे, मदन आरगडे, भास्‍कर काकडे, प्रभाकर भड, निखिल देशमुख, रघुनाथ गरड, बालाजी भड आदींच्या उपस्थितीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button