बार्शीमहाराष्ट्र

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त नाथपंथी डवरी गोसावी समाजातर्फे भाविकांना फराळ व औषधांचे वाटप

उपळे दुमाला येथे सामाजिक उपक्रम; तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांना मदतीचा हात

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे पायी जाणाऱ्या भाविकांसाठी बार्शी तालुक्यातील उपळे दुमाला येथे नाथपंथी डवरी गोसावी समाज बांधवांच्या वतीने फराळ व औषध वाटपाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत भाविकांना राजगिरा लाडू, केळी, आवश्यक औषधे तसेच झेंडूबामचे वाटप करण्यात आले.

तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा, वाटेत त्यांना आवश्यक मदत मिळावी आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी, या उद्देशाने समाज बांधवांनी पुढाकार घेतला. लांबचा पायी प्रवास करत असलेल्या भाविकांना फराळ आणि औषधांचे वाटप करून समाजाने सामाजिक बांधिलकी जपली.500या उपक्रमामुळे पायी जाणाऱ्या भाविकांना दिलासा मिळाला. धार्मिक यात्रेच्या निमित्ताने भाविकांची सेवा करण्याचा हा उपक्रम समाज बांधवांच्या सहकार्याने उत्साहात पार पडला.

यावेळी उपस्थित मान्यवर या कार्यक्रमास नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष काशिनाथ गोसावी, एकनाथ हिंगमिरे, राजेंद्र प्रभाळकर, नामदेव जाधव, राजेंद्र चव्हाण, पप्पू सरवदे, संजय शुक्ला, प्रमोद मोरे, दीपक बारुंगळे, रियाज तांबोळी, संदीप पवार आदी उपस्थित होते.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button