आमदार राजेंद्र राऊत यांच्या वाढदिवशीच नारी गावातील तीन सख्ख्या भावांचं रक्तदान , ५६ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : यंदा दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. या परिस्थितीची जाणीव ठेवून आमदार राजेंद्र राऊत यांनी वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच जाहिराती, बॅनर आणि इतर कार्यक्रमांवर अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि हितचिंतकांना केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत नारी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. बार्शी तालुक्यातील नारी येथे आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान ५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले . शिबिरात इरफान कादर काझी, इब्राहिम कादर काझी आणि अस्लम कादर काझी या तीन सख्ख्या भावांनी एकाच वेळी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा अनोखा संदेश दिला.
या भावंडांच्या उपक्रमाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या कृतीतून रक्तदानाचे महत्त्व आणि माणुसकीच्या नात्याची जाणीव अधोरेखित झाली. आमदार राजेंद्र राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त नारी येथे आयोजित या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल ५६ रक्तदात्यांनी रक्तदान करून या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवला.
या शिबिरात तीन सख्ख्या भावांनी एकाच वेळी केलेले रक्तदान हा विशेष चर्चेचा विषय ठरला. इरफान, इब्राहिम आणि अस्लम या तिन्ही भावांचे नाते केवळ रक्ताचे नाही तर समाजासाठी काहीतरी करण्याच्या भावनेतूनही दिसून आले.
रक्तदानामुळे गरजू रुग्णांना आवश्यकतेच्या वेळी मदत मिळू शकते, ही जाणीव ठेवून त्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. स्वतःच्या कृतीतून इतरांनाही रक्तदानासाठी प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमाचा महत्त्वाचा संदेश ठरला .वाढदिवस साजरा करण्याबरोबरच समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
यावेळी सरपंच अमोल रानमाळ, अमित कदम, राकेश पाटील, बापू जाधव, लखन शिंदे, विलास गायकवाड, प्रवीण शिंदे, विनोद कदम, सचिन रानमाळ, रामा माळी, अण्णा बदाले, बालाजी कोठावळे, तानाजी शिंदे, दादा माळी, सुजित बदाले, समर्थ बदाले, समाधान बदाले, राज बिरंजे, अनिकेत जगताप, गौतम शिंदे, विश्वास गायकवाड, सूरज मोरे तसेच राजाभाऊ राऊत मित्र मंडळाने परिश्रम घेतले.




