बार्शीमहाराष्ट्र

तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांना लाडू, केळी व पाण्याचे वाटप; श्री अशोक महाराज प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम

रातंजन येथे हजारो भाविकांनी घेतला उपक्रमाचा लाभ; ‘लोकसेवा हीच ईश्वरसेवा’ – अशोक नागटिळक

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : कोजागरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांसाठी बार्शी तालुक्यातील रातंजन येथे श्री अशोक महाराज प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत पायी जाणाऱ्या भाविकांना पाणी, केळी आणि लाडूचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.

वैराग ते तुळजापूर या मार्गावरून दरवर्षी हजारो भाविक श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी प्रवास करतात. या भाविकांना प्रवासादरम्यान मदत व्हावी, त्यांना थोडा दिलासा मिळावा, या उद्देशाने श्री अशोक महाराज प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी भाविकांची सेवा केली जाते.

‘लोकांची सेवा हीच ईश्वरसेवा’

श्री अशोक महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक नागटिळक यांनी लोकसेवेचे महत्त्व अधोरेखित करताना, “लोकांची सेवा हीच ईश्वरसेवा आहे,” अशी भावना व्यक्त केली. प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजाला सेवाभावाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. भाविकांना मदत करण्याच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपली जात असल्याचे यावेळी दिसून आले.500या उपक्रमावेळी आप्पा नागटिळक, अशोक नागटिळक महाराज, बापू नागटिळक, भैरवनाथ चौधरी, बबन काटकर, दीपक डिंगे , इरफान शेख, प्रविण कुलकर्णी, समर्थ पुराणिक, दत्ता बिराजदार, स्वप्नील भालशंकर समाधान वाघमारे, अभिराज नागटिळक, अनिकेत खंदारे , रितेश नागरगोजे, प्रवण तिसरबुडे, विकांत चव्हाण, वेदांत बोबडे , प्रवण कुंभार, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

भाविकांच्या सेवेसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून, श्री अशोक महाराज प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्यातून सेवाभावाचा संदेश देण्यात आला.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button