प्रशासनमहाराष्ट्ररत्नागिरी

‘लाच देणार नाही, लाच घेणार नाही..सर्व कामे प्रामाणिकपणाणे करेन ’; दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शपथ

B1न्यूज मराठी नेटवर्क500

रत्नागिरी, दि. २६ : “जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कायद्याचे काटेकोर पालन करेन, लाच घेणार नाही आणि लाच देणारही नाही… सर्व कर्तव्ये पारदर्शक व जनहिताच्या भावनेने पार पाडेन!” अशा एकात्मिक आणि बुलंद निर्धाराने आज जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दुमदुमला. निमित्त होते—शासनाच्यावतीने आयोजित ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’च्या शुभारंभप्रसंगी घेतलेल्या भ्रष्टाचार निर्मूलन शपथेचे.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आजपासून १ नोव्हेंबरदरम्यान संपूर्ण जिल्ह्यात ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या विशेष कार्यक्रमात उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध अखंड लढ्याची व सचोटीची सामूहिक शपथ घेतली.
500प्रगतीचा अडसर दूर करण्यासाठी सामूहिक लढा हवा देशाच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक विकासात भ्रष्टाचार हा सर्वात मोठा अडथळा ठरत आहे. या अनिष्ट प्रवृत्तीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केवळ प्रशासनच नव्हे, तर नागरिक आणि खासगी क्षेत्र या सर्वांनीच एकजुटीने काम करण्याची गरज आहे. प्रत्येकाने दक्ष नागरिक म्हणून जगताना प्रामाणिकपणाची सर्वोच्च मूल्ये जपली पाहिजेत, असा स्पष्ट संदेश या वेळी देण्यात आला. कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी उपस्थितांना सामूहिक प्रतिज्ञा दिली. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत सच्चेपणा आणि कायद्याचे काटेकोर पालन करेन. लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही.

सर्व कामे संपूर्ण प्रामाणिकपणाने व पारदर्शक पद्धतीने करेन.
सदैव जनहितासाठी कार्य करेन. व्यक्तिगत वागणुकीत सचोटीचे दर्शन घडवून इतरांसमोर आदर्श निर्माण करेन. भ्रष्टाचाराच्या कोणत्याही गैरप्रकाराची माहिती योग्य आभिकरणास देईन. या प्रसंगी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव, उपजिल्हाधिकारी रोहिणी रजपूत, तहसीलदार संजय भालेराव, बजरंग चौगुले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button