बार्शी

लायन्स क्लब बार्शीच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही स्वातंत्र दिनानिमित्त रक्तदान शिबिर

बार्शी शहर प्रतिनिधी : रोहित लोहार

बार्शी | लायन्स क्लब बार्शीच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही स्वातंत्र दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष असिफभाई तांबोळी , नगरपरिषद विरोधी पक्षनेते नागेशजी अक्कलकोटे , झोन चेअरमन नंदकुमारजी कल्याणी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष ॲड विकास जाधव, उपाध्यक्ष प्रशांतकाका पंडित,सचिव संतोष जोशी खजिनदार अल्ताफ शेख,लायन्स क्लब बार्शी राॅयलचे अध्यक्ष गणेश भंडारी, लायन्स क्लब बार्शी चेतना चे अध्यक्ष ईश्वरीताई जोशी, सचिव गायत्रीताई बंडेवार, खजिनदार जयश्रीताई कदम,रोटरी क्लबचे अध्यक्ष विक्रम सावळे, सरपंच परिषद जिल्हा समन्वयक शिवशंकर ढवण हे उपस्थित होते.

लायन्स क्लब बार्शीच्या वतीने गेली 42 वर्ष सातत्याने 15 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले आहे. ती परंपरा कायम ठेवली आहे सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिर अतिशय गरजेचे आहे लायन्स क्लबच्या माध्यमातून घेतलेल्या शिबिरात रक्तदात्यानी उत्साहात रक्तदान केले. याप्रसंगी अक्षय बंडेवार ,बापूसाहेब कदम ,गिरीश शेटे ,अनिल देशपांडे ,गोवर्धनदास जाजू ,जयप्रकाश भराडिया ,गोविंद तापडिया, नितिन कौलवार ,डॉ केशवराज मुळे ,दिनेश श्रीश्रीमाळ ,महेंद्र कथले ,संदीप नागणे , सरपंच परिषद महिला कार्याध्यक्ष गोटे आंधळकर ,पांडुरंग घोलप ,विकास माने , कुलभूषण देशमुख, बाबासाहेब जाधव, अभिजित जाधव, किरण जाधव यांच्या सह पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. बार्शी शहर प्रति

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button