उच्च शिक्षणासाठी लोकमंगलच्या ‘लोटस’ योजनेची साथचालू वर्षी २५ विद्यार्थ्यांना ४.८४ लाखांची शिष्यवृत्ती आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते धनादेश वितरण

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

सोलापूर : गरीब, गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक आधार देण्याच्या उद्देशाने लोकमंगल फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘लोटस’ शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत यंदाच्या शिष्यवृत्ती वितरण सोहळा उत्साहात पार पडला. 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी 25 विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन एकूण 4 लाख 84 हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या विद्यार्थ्यांना धनादेशांचे वितरण आमदार सुभाष देशमुख आणि बाजार समितीचे संचालक मनीष देशमुख यांच्या हस्ते तसेच लोटस कोअर कमिटीच्या वतीने वर्षभरात करण्यात आले.

शिक्षण हीच प्रगतीची गुरुकिल्ली मानून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी 2015 साली आमदार देशमुख यांच्या संकल्पनेतून ‘लोटस’ योजनेची सुरुवात करण्यात आली. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, हा या योजनेमागील प्रमुख हेतू आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर मार्गदर्शन, प्रेरणा आणि प्रोत्साहनही दिले जाते.

गेल्या 11 वर्षांत (2015 ते 2026) या योजनेद्वारे एकूण 222 हून अधिक विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले असून, आजपर्यंत सुमारे 87 लाख 63 हजार 102 रुपयांची शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली आहे. या मदतीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी डॉक्टर, अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट यांसारख्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन आपले करिअर घडविले आहे.

यावेळी आमदार सुभाष देशमुख म्हणाले, “उच्च शिक्षणाची संधी मिळाली तर ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील मुलेही मोठी स्वप्ने पूर्ण करू शकतात. विद्यार्थ्यांच्या प्रगतीतूनच समाजाचा विकास होतो. लोकमंगल फाउंडेशन विद्यार्थ्यांच्या क्षमतेला दिशा देण्यासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी भक्कम पायाभरणी करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.

कार्यक्रमास लोकमंगल फाउंडेशनचे सदस्य, पदाधिकारी, विद्यार्थ्यांचे पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी फाउंडेशनबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या