चंद्रपूरमहाराष्ट्र

‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत 18 फेब्रुवारी रोजी जनसुनावणी

B1न्यूज मराठी नेटवर्क500000

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांना त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिक स्तरावर आपले म्हणणे मांडण्याकरीता तसेच पिडीत महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत व्हावी, यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत 18 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता नियोजन भवन येथे जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. ही जनसुनावणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.

पिडीत महिला कोणतीही पूर्वसुचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहून लेखी समस्या आयोगापुढे मांडू शकेल. याबाबत महिलांनी कोणत्याही शासकीय विभागाकडील व कौटुंबिक हिंसाचार संबंधिच्या प्रलंबित असलेल्या तक्रारीबाबत किंवा नवीन तक्रारी लेखी नोंदवून सुनावणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आणि महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी केले आहे. नावनोंदणी सकाळी 9.30 वाजतापासून सुरू होणार आहे.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button