उद्घाटनदिनमहाराष्ट्रसांगली

संविधान दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शनाचे उद्‌घाटन,10 डिसेंबरपर्यंत भेटीची संधी

B1न्यूज मराठी नेटवर्क350

सांगली, दि. 26 : भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सांगली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी अंक व ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध लेखक डॉ. अनिल मडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, अप्पर कोषागार अधिकारी दीपाली यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे, सहाय्यक शिक्षक विठ्ठल मोहिते यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी व वाचनप्रेमी उपस्थित होते.

यावेळी डॉ. अनिल मडके यांनी भारतीय संविधान तसेच वाचनाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले, स्वागत व प्रास्ताविक अमित सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन विठ्ठल मोहिते यांनी केले. प्रारंभी फीत कापून प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यानंतर महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमापूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.350या ग्रंथप्रदर्शनामध्ये 70 हून अधिक दिवाळी अंक २०२६ तसेच भारतीय संविधानाच्या प्रति, महात्मा जोतीराव फुले यांची ग्रंथसंपदा मांडण्यात आली आहे. हे प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील स्मारक, सांगली येथे दि. 26 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक, संशोधक, वाचक आणि नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन ग्रंथसंपदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.350

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button