कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात ७७ वा भारतीय संविधान दिन व शहीद दिन उत्साहात साजरा

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात ७७ वा भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शहीद दिनानिमित्त शहीदांना विनम्र अभिवादनही करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन झाल्यानंतर उपस्थितांनी भारतीय संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. याशिवाय शहीद दिनानिमित्त देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते बप्पा सुतार, सतीश पाचकुडवे, नईम शेख मंत्री, शाम जानराव, राहुल लोंढे, हर्षद देशमुखे, आर्यन पोकळे आणि प्रेम लोंढे यांच्यासह ग्रंथालयाचे सभासद व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे आभार ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी मानले.




