दिनमहाराष्ट्रसोलापूर

संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन; शहीद जवानांनाही आदरांजली

B1न्यूज मराठी नेटवर्क350

सोलापूर, दि. २६ : भारतीय संविधान दिनानिमित्त सोलापूर येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या सहभागातून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करून २६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.350या कार्यक्रमास महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सहाय्यक आयुक्त (समाजकल्याण) सुलोचना सोनवणे, सामाजिक न्याय विभागातील अधिकारी व कर्मचारी, विविध वसतिगृहांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय संविधानाने अधोरेखित केलेली न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूलभूत मूल्ये समाजजीवनात रुजविणे, संविधानाप्रती आदरभाव निर्माण करणे आणि लोकशाही मूल्यांबाबत जनजागृती करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. संविधान दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून भारतीय संविधानाचे महत्त्व आणि त्यातील मूलभूत मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.350

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button