धाराशिवनोकरीमहाराष्ट्र

धाराशिवमध्ये लॉजिस्टिक्स पार्क, संरक्षण साहित्य निर्मिती उद्योग उभारणार स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणार – उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पुढाकारातून खासदार नोकरी महोत्सव उत्साहात

B1न्यूज मराठी नेटवर्क350

५० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांचा सहभाग रोजगारासाठी तरुणांचे होणारे स्थलांतर थांबविण्यावर भर

धाराशिव : शिक्षण पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या शोधात जिल्ह्यातील तरुणांना मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागू नये,त्यांच्या कौशल्याला स्थानिक पातळीवरच संधी मिळावी,यासाठी धाराशिव जिल्ह्यात लॉजिस्टिक्स पार्क, संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक साहित्य व उपकरणे निर्मिती करणारे उद्योग तसेच विविध रोजगाराभिमुख उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देत स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणार असल्याची ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या पुढाकारातून धाराशिव येथील छायादीप लॉन्स येथे 24 नोव्हेंबर रोजी आयोजित ‘खासदार नोकरी महोत्सव २०२६’ प्रसंगी उद्योगमंत्री सामंत बोलत होते.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ५० हून अधिक नामांकित कंपन्यांच्या सहभागातून हा महोत्सव उत्साहात पार पडला.350उद्योगमंत्री सामंत म्हणाले, धाराशिव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी नवीन उद्योगांची उभारणी,औद्योगिक गुंतवणूक वाढविणे तसेच रोजगारनिर्मितीला प्राधान्य देण्यात येणार आहे. लॉजिस्टिक्स पार्क,संरक्षण साहित्य व उपकरणे निर्मिती उद्योगांसह विविध रोजगाराभिमुख उद्योगांच्या माध्यमातून जिल्ह्यातील तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. रोजगारासाठी तरुणांचे स्थलांतर थांबविण्यावर भर धाराशिव जिल्ह्यातील सुशिक्षित तरुणांना रोजगारासाठी मोठ्या शहरांकडे जावे लागू नये, यासाठी जिल्ह्यातच उद्योगांचे जाळे निर्माण होणे आवश्यक आहे.नवीन उद्योगांच्या उभारणीतून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर स्थानिक व्यवसायांना चालना मिळून जिल्ह्याची अर्थव्यवस्थाही अधिक बळकट होण्यास मदत होईल,असे उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले.

५० हून अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग
जिल्ह्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या खासदार नोकरी महोत्सवात ५० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदविला. विविध शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांना त्यांच्या शिक्षण आणि कौशल्याच्या आधारावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. विशेष म्हणजे,निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्याची व्यवस्थाही या महोत्सवात करण्यात आली होती.
350

तरुणांच्या रोजगारासाठी सातत्याने पाठपुरावा करणार – खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील तरुण-तरुणींना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार मिळावा,त्यांच्या कौशल्याला योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि ते आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत,या उद्देशाने खासदार नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यात नवीन उद्योग यावेत,स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती व्हावी आणि जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सांगितले.350यावेळी अजीत पिंगळे,संतोष सोमवंशी, डॉ.जयप्रकाश राजेनिंबाळकर,दत्ता आन्ना साळुंके,सुधीरअण्णा पाटील, सुरज सावंके,अजित लाकाळ, अनंत लंगडे,ऋषीभैया मगर, नागेश अण्णा अक्कलकोटे, व्यंकटराव गुंड,सोमनाथ अप्पा गुरव,गणेश जगताप, लक्ष्मीकांत फुलकुटे,अनंत वाघमारे,प्रदीप मुंडे,अमित उंब्रे,नाना घाडगे,प्रशांत साळुंके,अनंत भालेराव, मनोहर धोंगडे,पप्पू आबा मुंडे,काका शिंनगारे,प्रतीक रोचकरी,मनीषा वाघमारे, संगीता काळे,श्वेता दुरुगकर, देवकन्या गाडे,माया चव्हान, लिंबराज डुकरे,नितीन शेरखाने,मोईन पठाण,प्रशांत साळुंके,बालाजी झेंडे यांच्यासह विविध पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच नोकरी इच्छुक तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.350

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button