पत्रकार विषयकपुरस्कारमहाराष्ट्रसोलापूर

“राज्य शासनाचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2025 साठी प्रवेशिका मागविण्याचे आवाहन”

सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांनी 15 मार्चपर्यंत अर्ज सादर करावेत

B1न्यूज मराठी नेटवर्क500000

सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, लेखन, दूरचित्रवाणी वृत्तकथा, छायाचित्रण, समाज माध्यम तसेच स्वच्छता अभियानाबाबत जनजागृतीपर लेखनासाठी ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2025’ पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.

या पुरस्कारासाठी 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन, छायाचित्रे व वृत्तकथा यांची प्रवेशिका मागविण्यात येत आहे. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 15 मार्च 2026 असा आहे.

सोलापूर जिल्ह्यांतील इच्छुकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अर्ज प्राप्त करून घ्यावेत. तसेच स्पर्धेच्या नियमावली विषयी सविस्तर माहिती घ्यावी. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत. तरी सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांनी राज्य शासनाच्या या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी सोलापूर यांच्यावतीने करण्यात येत आहे.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button