बार्शीमहाराष्ट्रयोजनाशिबीर

आई वडिलांचे कष्ट आणि त्याग डोळ्यासमोर ठेवा – एफ. आर. शेख, तहसीलदार बार्शी

बार्शी येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा विशेष श्रमसंस्कार शिबिराला प्रारंभ!

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बार्शी अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या वतीने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि. १६ फेब्रुवारी २०२६ ते दि. २१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संपन्न होणार असून, शिबिराचे उदघाट्न बार्शीचे तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी एफ. आर. शेख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल बंडेवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राहुल मांजरे, मधुकर डोईफोडे, डॉ. पटेल, प्रदीप बागमार, शैलेश सदाफुले, पांडुरंग पाठक, उमेश काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना संबोधित करताना तहसीलदार एफ आर शेख म्हणाले की, आई-वडिलांचे कष्ट व त्याग विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवून आपले योगदान देणे गरजेचे आहे. भविष्यामध्ये तुम्हाला व्यवसाय व नोकरीसाठी खूप मोठ्या संधी आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवोपक्रम विभागांतर्गत आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, श्रमाची प्रतिष्ठा, नेतृत्वगुण, राष्ट्रसेवेची भावना रुजविण्याचा प्रयत्न, समाजाभिमुख उपक्रम, स्वच्छता अभियान, पर्यावरण जनजागृती, ग्रामविकास तसेच सामाजिक ऐक्य वाढविणे हे शिबिराचे प्रमुख उद्दिष्ट असून सर्व विद्यार्थ्यांनी हे गुण अंगीकृत करून शिबिराचा उद्देश साध्य करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.50000

शिबिराचे नियोजन संस्थेचे प्राचार्य प्रा. प्रदीप हरिदास यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिक आडूरकर यांनी केले. प्रस्तावना बसवराज मोटे यांनी केली तर उपस्थितांचे आभार युवराज माढेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी रमेश मिरगणे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button