बार्शीत महाशिवरात्रीनिमित्त भाविकांना सुगंधी दुधाचे वाटप
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ,सटवाई गल्ली,श्री उत्तरेश्वर मंदिर जवळ,मंगळवार पेठ बार्शी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी
महाशिवरात्रीनिमित्त शिवभाविकांना सुगंधी दुधाचे वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे हे 11 वे वर्ष असून मंडळाच्या वतीने विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविले जातात. संध्याकाळी श्री संत विसोबा खेचर महाराज यांची आरती करुन महाशिवरात्रीनिमित्त श्री उत्तरेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांना सुगंधित दुधाचे वाटप करण्यात आले. शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी श्री सिद्धिविनायक मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
संतोष घोलप व घोलप परिवाराच्या वतीने सुमारे अकराशे उपवासाच्या राजगिरा लाडूचे मोफत वाटप श्री उत्तरेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना करण्यात आले.





