वंचित बहुजन आघाडीतर्फे 500 उच्चाशिक्षित मुलांचा सत्कार

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

नाशिक : उच्चशिक्षित मुले हीच देशाची खरी संपत्ती आहे. या मुलांनी आपल्या ज्ञानाचा इतरांनाही मिळवून द्यावा आणि देशाचा विकास साधावा,असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे सतपूर विभागीय अद्यक्ष बजरंग शिंदे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे 500 उच्च शिक्षित मुलांचा सत्कार आणि त न्यायमूर्ती अनिल वैद्य यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी शिंदे बोलत होते.

न्या. वैद्य यांनी यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व्याख्यान दिले. व्यासपीठावर सहाय्यक पोलीस आयुक्त वसंतराव मोरे, माजी आमदार डॉ.अपूर्व हिरे,वंचित बहुजन आघाड़ीचे महानगराध्यक्ष अविनाश शिंदे,मा.नगरसेवक भागवत अरोटे,ज्योती शिंदे, डॉ.चंचलताई साबळे,डॉ. सुरसे,संजय भोसले, सुरेश उबाळे,संजय तायडे,विनोद आवारे,
विजय आहिरे आदी होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच वंचितांना शिक्षणाची दारे खुली झाली आणि विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा उमटवून त्यांनी आपली प्रगती साधली आणि म्हणूनच आज दलित,शोषित,उपेक्षित मुलांना सन्मानाने जगता येते,असे न्यायमूर्ती वैद्य म्हणाले.वसंत मोरे आणि आ.अपूर्व हिरे यांनीही यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास उलगडून दाखविला.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीच्या औचित्य साधून वंचित वंचित बहुजन आघाडीच्या महानगरातर्फे 132 किलो लाडूंचे वाटप करण्यात आले.सिडको आणि नाशिकरोड मिरवणुकीत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व नेते सहभागी झाले होते मिरवणुकीत सहभागी झालेल्या चित्ररथांच्या प्रमुखांचा अविनाश शिंदे यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला या प्रसंगी विक्रम शिंदे,देवीदास आहिरे आपा आव्हाड, प्रमोद वाघमारे कैलास सोनवने,बाबू खरात, रवि मोरे,सोनू गांगुर्दे, आनंद घोड़के नितिन सूरडकर,विक्की भालेराव, प्रथमेश पालवे, साक्षी शिंदे दीपक श्रृंगारे, असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते ऊपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून समाजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी काहीतरी करावे हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून उच्चशिक्षित मुलांचा सत्कार आम्ही घडवून आणला.तसेच लाडूवाटपसह आगळे वेगळे कार्यक्रम राबविण्याची परंपरा आम्ही जोपासली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या