लातूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १८ फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

0

सर्वांना विनामुल्य प्रवेश; कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

लातूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि लातूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर येथील बार्शी रोडवरील दयानंद सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन लातूर जिल्हा प्रशासनाने केले आहे.

यावेळी ‘आम्ही जिजाऊच्या लेकी’ या कार्यक्रमांतर्गत शिवचरित्र, शाहिरी पोवाडे, स्फुर्तीगीते व लोकगीतांचे सादरीकरण केले जाणार आहे. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची गौरवगाथा, त्यांचा पराक्रम व प्रेरणादायी जीवन नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन लातूर जिल्हा प्रशासनाने केले आहे.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या