जयंतीबार्शीमहाराष्ट्र

बार्शीत शिवजयंती निमित्त स्वच्छता मोहीम संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वृक्ष संवर्धन समिती बार्शी तर्फे शिव परिसर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी श्री शिवाजी महाविद्यालय समोरील शिवरायांच्या पुतळ्या समोरील परिसराची स्वच्छता करण्यात आली. तीन दिवस चाललेल्या या स्वच्छता मोहिमेत अनेक शिवप्रेमींनी सहभाग नोंदवला. दररोज सकाळी सहा ते आठ दरम्यान ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

गेल्या पाच वर्षापासून वृक्ष संवर्धन समिती बार्शी कडून महापुरुषांच्या जयंती निमित्त अशा प्रकारची स्वच्छता मोहीम राबविण्यात येते अशी माहिती वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे यांनी दिली. तीन दिवस परिसर स्वच्छ केल्यानंतर श्री शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला जलाभिषेक करून पुतळा स्वच्छ करण्यात आला. या मोहिमेसाठी बार्शी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील सहभाग नोंदवून सहकार्य केले.

यावेळी श्री शिवाजी प्रसारक मंडळाचे सचिव बापूसाहेब शितोळे, बार्शी नगरपालिका आरोग्य अधिकारी शब्बीर वस्ताद, नगरसेविका सायरा मुल्ला हे उपस्थित होते. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी राहुल तावरे, प्रा मोहमद शेख, सचिन शिंदे, डॉ.सचिन चव्हाण, उमेश नलवडे, संतोषकुमार गायकवाड, बाबासाहेब बारकुल, विष्णू भोसले, राणा देशमुख, वीरेंद्र बंडे, सुनिता गायकवाड, दिपाली उकिरडे, योगेश गाडे,अक्षय भोईटे, अक्षय घोडके, महेश बकशेट्टी, अभिजित बोबडे, समर्थ तुपे, उदय कुमार पोतदार, राजाभाऊ आडसुळ, अजित नडगिरे, उमाकांत बुगडे, प्रफुल्ल गोडगे, रतिकांत हमने, अमृत खेडकर, जयेश गुप्ता, सचिन मस्के, तात्यासाहेब शेंडगे, अख्तर शेख आदींनी परिश्रम घेऊन सहभाग नोंदवला.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button