भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागामार्फत विविध कार्यक्रम संपन्न

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

ठाणे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त ठाणे सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत कोर्ट नाका येथील टाऊन हॉल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस उप जिल्हाधिकारी (रोहयो) दिपक चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण केले.

यावेळी ठाणे समाज कल्याणचे सहायय्क आयुक्त समाधान इंगळे, बबनराव सरोते, समाज कल्याण विभागाचे कर्मचारी तसेच ठाणे जिल्हयातील मागासवर्गीय वसतिगृहाचे अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

सहायक आयुक्त कार्यालयाच्या वतीने ठाणे शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली.तसेच टाऊन हॉलमध्ये विविध सांस्कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शासकीय मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.

सन 2023 मध्ये घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धाच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा रागोळीतून रेखाटणारे कलाकार रोहित लोकरे व अजय सातंगे यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

यावेळी ठाणे समाज कल्याणचे सहायक आयुक्त समाधान इंगळे म्हणाले की, मागासवर्गीय घटकांतील योजना आपण लोकापर्यंत पोचवायच्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीय समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यासाठी वेगवेगळया योजना समाज कल्याण विभाग राबवत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखी बुध्दीमत्ता आपल्यात विकसित झाली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या