जयंतीबार्शी

बार्शीच्या वक्तृत्व स्पर्धेतील वक्ते महाराष्ट्र मध्ये उच्च स्तरावर चमकतील – जयकुमार शितोळे

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : विश्वभुषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त, क्रांती बहुउद्देशीय संस्था बेलगाव, बार्शी च्या वतीने, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह बार्शी या ठिकाणी, महापुरुषांच्या विचारांचा जागर करत, राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

क्रांती बहुउद्देशीय संस्था आयोजित राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

बार्शी शहर आणि तालुक्याला शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक आणि कलाक्षेत्राची मोठी जुनी परंपरा लाभलेली आहे. आतापर्यंत बार्शी मध्ये अनेक दिग्गज मान्यवर येऊन गेलेले आहेत. क्रांती बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून, महापुरुषांच्या विचारांचा जागर करत वक्त्यांना एक चांगले व्यासपीठ निर्माण करून दिले असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार जयकुमार शितोळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात पम्हटले. पुढे बोलताना ते म्हणाले की, बार्शीच्या या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील वक्ते, भविष्यात महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रांमध्ये उच्चस्थानी चमकतील व बार्शीच्या वक्तृत्व स्पर्धा कायम त्यांच्या स्मरणात राहतील असे प्रतिपादन त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी स्मार्ट अकॅडमी चे संचालक सचिन वायकुळे यांनी देखील, भाषण कौशल्य या विषयावर प्रकाश टाकत, भाषण कौशल्याची सुत्र, मांडणी, आशय, विषय, निष्कर्ष सादरीकरण आदी पैलू उपस्थितांना आपल्या शैलीमध्ये सांगत वक्तृत्वाचे महत्त्व पटवून दिले. पुढे बोलताना म्हणाले कि, दोन मिनिटाच्या भाषणाने स्वामी विवेकानंद यांनी आख्ख जग जिंकलं तर आपल्याकडे सात मिनिटे आहेत, त्यामध्ये आपण महापुरुषांच्या विचारांची पेरणी करत अनेक जणांच्या मनामध्ये घर करू असेही ते म्हणाले.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील विविध 14 जिल्ह्यातून 55 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे पारितोषिक, प्रथम क्रमांक : 21 हजार 132 रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुस्तक, द्वितीय क्रमांक : 15 हजार 132 रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुस्तक, तृतीय क्रमांक : 10 हजार 132 रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुस्तक, उत्तेजनार्थ क्रमांक : 5 हजार 132 रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुस्तक देऊन उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर स्पर्धेमधील सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धाकांना अनुक्रमे खालील प्रमाणे विभागून पारितोषिक देण्यात आले :- प्रथम पारितोषिक : संकेत पाटील – गडहिंग्लज कोल्हापूर, यश पाटील – मुंबई, द्वितीय पारितोषिक : हर्षवर्धन आलासे – पुणे, प्रसाद लोखंडे – कोल्हापूर, तृतीय पारितोषिक : श्राविका जाधव – आगळगाव बार्शी, अथर्व खरे – वाई सातारा, उत्तेजनार्थ पारितोषिक : तीर्थराज इंगळे – जामनेर जळगाव, शितल वाघमारे – करमाळा

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार जयकुमार शितोळे यांनी भूषविले तर विचार मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, माजी विरोधी पक्षनेते विजय राऊत, मराठा सेवा संघाचे किरण गाढवे, विश्व हिंदू परिषदेचे बापूसाहेब कदम, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे, कलायात्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण गाढवे, पत्रकार गणेश गोडसे, चाटे कोचिंग क्लासेसचे घाडगे सर, माजी नगरसेवक शंकर देवकर, माधवराव देशमुख, ऍडव्होकेट अलाट, पत्रकार उमेश पवार, सुमित कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. तर कार्यक्रमासाठी पत्रकार बांधव व श्रोते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

दिवसभर चालू असलेल्या राज्यस्तरीय खुल्या गटातील वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण, दलित महासंघाचे बार्शी शहराध्यक्ष संदीप आलाट व व्याख्याते मंगेश दहीहांडे यांनी केले तर टाईम किपर म्हणून अबोली दीक्षित-पालके यांनी काम पाहिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष धिरज शेळके यांनी केले. सूत्रसंचालन सुवर्णा देवकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार आभार प्रवीण भडके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी अजय कांबळे, आतिश पालके, परमेश्वर चांदणे, जगन्नाथ जाधव, गणेश राजपूत, गणेश इंगोले, प्रतिज्ञा गायकवाड, विकी गोंदकर आदींनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button