२०२५ ते २०३० बार्शी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यातील सन २०२५ ते २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सरपंच पदांच्या आरक्षणाची सोडत प्रक्रिया बुधवार दि. १३ मे २०२६ रोजी पार पडली. जिल्हाधिकारी सोलापूर (ग्रामपंचायत शाखा) यांच्या आदेशानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. यापूर्वी दि. १५ जुलै २०२५ रोजी निश्चित करण्यात आलेले आरक्षण अधिक्रमित करून नव्याने आरक्षण सोडत काढण्यात आली.
बार्शी तालुक्यातील एकूण १२९ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये अनुसूचित जातींसाठी ११, अनुसूचित जमातींसाठी १, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ३४ तर उर्वरित पदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव करण्यात आली आहेत. यामध्ये महिलांसाठी स्वतंत्र आरक्षणाचाही समावेश करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी चिठ्ठीद्वारे सोडत प्रक्रिया राबविण्यात आली. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी यापूर्वी निश्चित करण्यात आलेले आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे.
अनुसूचित जाती आरक्षण
वांगरवाडी, गौडगाव, मोडेगाव, मळेगाव, सावरगाव ही गावे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव करण्यात आली आहेत.
अनुसूचित जाती महिला आरक्षण
जामगाव (पा), दडशिंगे, तांदुळवाडी, गोरमाळे, धामणगाव (आ) आणि दहिटणे ही गावे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आली आहेत.
अनुसूचित जमाती आरक्षण
शेलगाव (मा) हे गाव अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले असून अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी कोणतेही आरक्षण घोषित करण्यात आलेले नाही.
नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण
खडकोणी, भानसळे, वाणेवाडी, घारी, कापशी, महागाव, पिंपळगाव (पानगाव), बोरगाव (झाडी), हळदुगे, मुंगशी (आर), रातंजन, ज्योतीबाचीवाडी, सुडौं, पुरी, इले, उंबरगे तसेच हत्तीज/चिंचखोपन/हिंगणी (आर) ही गावे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव करण्यात आली आहेत.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण
कोरेगांव, काटेगांव, भोयरे, चिंचोली-ढेंबरेवाडी, ममदापूर, अरणगांव, घाणेगांव, ढोराळे, मालेगांव, संगमनेर, तुळशीदासनगर, तडवळे, आंबेगांव, कारी, चिखर्डे, नांदणी आणि जामगांव (आ) या गावांचा समावेश नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला आरक्षणात करण्यात आला आहे.
सर्वसाधारण आरक्षण
सर्वसाधारण पुरुष –
आगळगांव, पिंपळगांव (आ),गाडेगांव, बाभुळगांव, चारे, पिंपळवाडी, उक्कडगांव/वाघाचीवाडी, शिराळे, धानोरे, जहानपूर, पांगरी, पांढरी, घोळवेवाडी, नारी/नारीवाडी, सौंदरे,कव्हे, कळंबवाडी (पा), गाताचीवाडी/फपाळवाडी, खांडबी/गोडसेवाडी, श्रीपतपिंपरी, साकत, मानेगांव, इर्लेवाडी, तुर्कपिंपरी, यावली, मुंगशी (वा), भातंबरे, उपळे (दु.), झरेगांव, सर्जापूर,भांडेगांव, सारोळे,लाडोळे, पिंपरी आर, नागोबाचीवाडी / लक्ष्याचीवाडी, कासारवाडी, गुळपोळी, रस्तापूर, राळेरास, रऊळगाव, कासारी, धोत्रे.
सर्वसाधारण महिला आरक्षण
चुंब,कळंबवाडी (आ), बेलगांव, देवगांव,बोरगांव (खुर्द), वालवड,पाथरी,पिंपळगांव (पा.),येळंब,खामगांव, इंदापूर,ताबडी,बळेवाडी, बावी,पानगांव, कोरफळे, अलिपूर, उपळाई (ठोंगे),शेंद्री, उंडेगांव,काळेगांव, मालवंडी,सासुरे, तांबेवाड,हिंगणी (पा),निंबळक, शेळगांव, (आर), धामणगांव (दु), भालगांव, अंबाबाईचीवाडी, आळजापूर, ताडसौंदणे, रुई, खडकलगाव, कांदलगाव, शेलगाव व्हळे, कुसळंब, भोईंजे, पिंपरी (पान), झाडी, मिर्झनपूर





