भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दिन महापालिकेत उत्साहात साजरा
B1न्यूज मराठी नेटवर्क
कल्याण डोंबिवली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीदिनानिमित्त आज महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी महापालिका मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याचप्रमाणे कल्याण पश्चिमेतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासही आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शहर अभियंता अर्जुन अहिरे, उपआयुक्त वंदना गुळवे,अतुल पाटील, धैर्यशील जाधव, महापालिका सचिव संजय जाधव, कार्यकारी अभियंता जगदीश कोरे,घनश्याम नवांगुळ, शैलेश कुलकर्णी, माजी महापौर रमेश जाधव, माजी पालिका सदस्य रेखा जाधव, प्रशासन अधिकारी विजय सरकटे, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, विधी अधिकारी आनंद सुर्यवंशी, सहा.आयुक्त तुषार सोनवणे, राजेश सावंत, हेमा मुंबरकर, दिनेश वाघचौरे, सहा.सुरक्षा अधिकारी किसन जाधव, इतर अधिकारी/ कर्मचारी वर्ग तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापालिकेच्या डोंबिवली विभागातही अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी डोंबिवली कार्यालयाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आणि डोंबिवली विभागीय कार्यालयातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी परिमंडळ 2 च्या उपआयुक्त स्वाती देशपांडे, सहा.आयुक्त भरत पाटील, संजय साबळे इतर अधिकारी/ कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.