डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे, जात मोडण्याचे नाव – कॉ. प्रा. तानाजी ठोंबरे
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव जात मोडण्याचे नाव आहे, बाबासाहेबांना जाती मोडायच्या होत्या, गरीब कष्टकरी वर्गाची एकजूट होण्यासाठी जात हा सर्वात मोठा अडथळा आहे असे बाबासाहेबांना वाटत होते, जात टिकवण्यासाठी ब्राह्मणी धर्म व्यवस्थेने स्त्रीचा वापर केला आहे, सध्या समाजामध्ये असणारे प्रश्न संपवायचे असतील तर जाती विरहित गरिबांची एकजूट करावी लागेल.” असे मत कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे यांनी आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.
यावेळी महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना सुरेखा शितोळे व सुरेखा शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मंचावर दलित अधिकारांदोलनाचे संघटक कॉम्रेड बालाजी शितोळे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉमेड अनिरुद्ध नखाते यांनी , तर सूत्रसंचालन कॉ. डॉ. प्रवीण मस्तुद यांनी केले, आभार कॉ.बालाजी शितोळे यांनी मानले. यावेळी शिक्षक संघटनेचे सचिन झाडबुके अनिस उमेश पोतदार, विनोद गायकवाड, भिमा मस्के , सुमन कांबळे,सरवदे ताई, भरत भोसले, अभिजीत चव्हाण, भारत चव्हाण, वैशाली बनसोडे आदी उपस्थित होते.