कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलिस निरीक्षक महारुद्र परजणे यांना ‘राष्ट्रपती शौर्यपदक’ प्रदान

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील कर्तव्यपरायण व निष्ठावान पोलीस अधिकारी सहाय्यक निरीक्षक श्री. महारुद्र बबन परजणे यांना त्यांच्या उत्कृष्ट आणि धाडसी सेवेबद्दल ‘राष्ट्रपती शौर्यपदक’ प्रदान करण्यात आले आहे. या राष्ट्रीय सन्मानाने सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणखी उंचावला आहे.

परजणे यांनी नक्षलप्रभावित भागात सलग सहा वर्षे सेवा देताना धाडसी कारवाया केल्या असून, विविध गुप्त माहितीच्या आधारे नक्षलवाद्यांविरुद्ध केलेल्या कारवाईमुळे पोलीस खात्यातील वरिष्ठांकडूनही त्यांची प्रशंसा झाली होती. त्यांच्या या शौर्यपूर्ण कर्तृत्वाची दखल घेऊन राष्ट्रपतींच्या हस्ते हा गौरव प्रदान करण्यात आला.50000

या पार्श्वभूमीवर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. जिल्ह्यातील पोलीस दल, प्रशासकीय अधिकारी, विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांनी परजणे यांचे अभिनंदन केले आहे.

पोलीस खात्यातील अनेक आव्हानांना सामोरे जात असताना त्यांनी दाखवलेली तत्परता, बुद्धिमत्ता आणि शौर्य हे नवोदित पोलिसांसाठी आदर्शवत ठरले आहे. परजणे हे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील असून, आपल्या सेवेच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्याचे नाव देशपातळीवर उज्वल केले आहे.

सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी परजणे यांचे अभिनंदन करताना सांगितले, “अशा अधिकाऱ्यांमुळेच पोलीस दलात नवा आत्मविश्वास निर्माण होतो. त्यांच्या कार्यामुळे जनतेचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होतो.”5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या