सोलापूर जिल्ह्यात बाशींची नाटय परंपरा सर्वात जुनी – माजीमंत्री दिलीप सोपल

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : सोलापूर जिल्ह्यात बाशींची नाटय परंपरा सर्वात जुनी असून पूर्वीच्या काळी प्रकाश योजना म्हणून गॅस बत्यांच्या प्रकाशात गल्लोगल्ली, चौका-चौकात नाटके सादर केली जायची. नाटकांच्या तालमी घरा-घरात, मंदिरात व मठात घेतल्या जायच्या. सन १९४८ ते १९५३ हा बालगंधर्वाचा सुवर्णकाळ बार्शीत गेला. नाटकाच्या निमित्ताने महिनोनमहिने बालगंधर्व बाशी मुक्कामी असायेच, ज्येष्ठ साहित्यिक बाबा कदम, गुळाचा गणपती या चित्रपटाचे सह दिग्दर्शक व कलावंत तम्मा कोरे, व्यंगचित्रकार खलिलखान, ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे, ज्यांनी आपल्या शाहीरी आवाजातून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला असे शाहीर अमर शेख व त्यांची कन्या ज्येष्ठ साहित्यिका मालिका अमर शेख ही सर्व कलावंत मंडळी या मातीची देणगी आहे.

‘तो मी नव्हेच’ व ‘एकच प्याला’ या नाटकाचे शेवटचे प्रयोग बार्शीच्या सिल्व्हर ज्युबिलीच्या रंगमंचावर झाले. बार्शी येथे मराठी साहित्य मंडळाची स्वतःची वास्तू आहे. सन १९८० साली ५४ वे अ.भा. मराठी साहित्य संमलेन ज्येष्ट साहित्यिक गं.बा. सरदार यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले. बार्शीच्या श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय व शिवाजी महाविद्यालयाचा ‘युवा महोत्सवाचा’ जिल्हयात आजही दबदबा कायम आहे. आणि हीच परंपरा पुढे नेण्याचे काम सध्या नाटय परिषदेच्या माध्यमातून परिषदेचे अध्यक्ष सोमेश्वर घाणेगांवकर हे करीत आहेत असे मत माजी कॅबिनेट मंत्री अॅड दिलीप सोपल यांनी व्यक्त केले. अ.भा. मराठी नाटय परिषद, मुंबई नियामक मंडळाच्या सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी सोलापूरच्या ‘नटराज पॅनल’ पुरस्कृत सहा उमेदवारांच्या प्रचारार्थ तुळजापूर रोड वरील ढाळे यांचे शेतातील स्नेह मेळाव्यात ते बोलत होते.

याप्रसंगी उमेदवार विजय साळुंखे, दिलीप कोरके, समद फुलमामडी, ज्योतिबा काटे, विनोद शेंडगे व यतीराज वाकळे यांनी नटराज पॅनलची भूमिका आपापल्या मनोगतातून स्पष्ट केली. यावेळी व्यासपिठावर प्रा. अशोक सावळे, बाळासाहेब आडके, राजू रंगम, हिरालाल धुडम, कृष्णा हिरेमठ, शिवप्रसाद चिक्का, सुनील मोहिते, राजू उराडे आशपाक काजी, श्रीधर भोसले, सुहास माने व तम्मा फुलारी आदी मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बार्शी नाटय परिषदेचे सदस्य विजयश्री पाटील, मधुरा पाटील, प्रा. माधुरी शिंदे, ममता चोप्रा, उल्का डोंबे, भारती पाटील, वंदना देवणे, सूर्यकांत वायकर, अनिल जोशी, डॉ. विशाल लिंगायत, सतिश होनराव, प्रशांत ढोले, नागेश गाभणे, गणेश सावंत, आकाश पाटील, यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या