आमदार राजेंद्र राऊत यांच्या शुभहस्ते वासुदेव समाज मंदिर व वैदु समाज मंदिर चे भुमिपुजन संपन्न

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : शहरातील वैदू वस्ती,गुंड प्लॉट,परंडा रोड येथे आमदार निधीतून १५ लाख रूपये व वैदु समाजासाठी २० लाख रुपये मंजूर समाज मंदिराचे भुमिपुजन भटक्या जाती व विमुक्त जमाती कल्याण समिती महाराष्ट्र राज्याचे सदस्य तथा लोकप्रिय आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी वासुदेव समाज व वैदु समाजाचा वतीने आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार करण्यात आला तसेच वासुदेव समाजाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

बार्शी शहरातील प्रत्येक समाजातील समाज बांधव यांच्या समस्या फक्त जाणून न घेता त्या प्रत्यक्षात सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत.एक लोकप्रतिनिधी या नात्याने नागरिकांच्या अपेक्षा आणि त्यांना भेडसावणारे प्रश्न याकडे नेहमी लक्ष ठेऊन असतो, म्हणून वेळोवेळी पाठपुरावा करून माझे कर्तव्य मी पार पाडत असतो. याच कार्यतत्परतेने भविष्यातही असे विविध प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबध्द आहे असे आमदार राजाभाऊ राऊत यांनी उपस्थित नागरिकांना सांगितले.

यावेळी बार्शी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी,बार्शी नगरपालिकेचे माजी नगरसेवक भारत पवार सर,शरद फुरडे,वासुदेव समाजसेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण डोईजड,संतोष हादवे,जगदीश उमरीकर,सतिश हलवाई,अनिल चव्हाण,महादेव अनवले,भारत (दादा ) धुर्वे, बालाजी (मामा) शिंगनाथ,ॲड.महादेव यादव,संतोष कानडे, पांडुरंग शिंगनाथ,अविनाश शिंगनाथ,महारुद्र घोडके, चुडामन सुक्ते,उदय गवळी,चंद्रकांत धुर्वे,श्रीनाथ धुर्वे,शरद सातपुते, संभाजी घोडके,भोला अडसुळ,नागनाथ आडसुळ तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या