बार्शीत श्री.भगवंत मंदिर स्वच्छता मोहीम संपन्न
बार्शी : येणाऱ्या श्री भगवंत प्रकट दिन तसेच महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त वृक्ष संवर्धन समिती बार्शी तर्फे भगवंत मंदिर तसेच परिसराची स्वच्छता करण्यात आली या या स्वच्छता मोहिमेत जय भगवंत ढोल ताशा पथक बार्शी तसेच भगवंत आरती मंडळ बार्शी यांच्या सदस्यांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली. मागच्या वर्षीपासून वृक्ष संवर्धन समिती मार्फत महापुरुषांच्या जयंती निमित्त शहरातील विविध भागात स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले जाते मागच्या वर्षी देखील भगवंत महोत्सवाच्या निमित्त अशी स्वच्छता मोहीम राबवली होती व सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला होता. आज रविवारी सकाळी सहा ते साडेनऊ या दरम्यान सर्व सदस्यांनी हातात झाडू खराटा टोपली घेऊन मंदिरातील सर्व काना ना कोपरा झाडून स्वच्छ केला.
त्यानंतर मंदिरातील गाभारा, शिखर तसेच सभामंडप आजूबाजूचे सर्व परिसर स्वच्छ पाण्याने धुण्यात आला. मागच्या पाच वर्षापासून वृक्ष संवर्धन समिती मार्फत विविध भागात झाडे लावून त्यांची जोपासना केली जात आहे. हरित बार्शी स्वच्छ बार्शी आणि सुंदर बार्शी या त्यांच्या घोषवाक्य प्रमाणे वृक्ष संवर्धन समितीचे कार्य सुरू आहे त्यांच्या या कार्याला बार्शी शहर परिसर येथील विविध संघटनाचा पाठिंबा मिळत आहे आज देखील जय भगवंत ढोल ताशा पथक बार्शी तसेच भगवंत आरती मंडळ बार्शी च्या सर्व सदस्यांनी या मोहिमेत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.