मनपा मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
B1न्यूज मराठी नेटवर्क
नाशिक : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. रात्री 12 वाजता शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मा. पालकमंत्री महोदय दादाजी भुसे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार समीर भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते. मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आज दि. १४ एप्रिल रोजी स्वागत कक्षाजवळ आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. मनपा कर्मचारी गुणवंत वाघ यांनी बुध्द वंदना म्हटली. मा. आयुक्तांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची महती सांगून सर्व कर्मचाऱ्यांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त करुणा डहाळे, उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंढे, उपायुक्त नितीन नेर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी नरेंद्र महाजन, मुख्य लेखा परीक्षक उत्तमराव कावडे, कार्यकारी अभियंता जितेंद्र पाटोळे, कार्यकारी अभियंता नितीन पाटील, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय शिरसाठ आदी अधिकारी आणि महानगरपालिकेतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.