डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
B1न्यूज मराठी नेटवर्क
परभणी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
अपर जिल्हधिकारी डॉ. प्रताप काळे, उप विभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार गणेश चव्हाण यांच्यासह अनुयायी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त आज अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर यांच्यासह अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.