भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नमुंमपा मुख्यालयात अभिवादन
B1न्यूज मराठी नेटवर्क
नवी मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते प्रतिमेस पुष्पमालिका अपर्ण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त नितीन नार्वेकर, परिमंडळ 1 चे उपआयुक्त सोमनाथ पोटरे, परवाना विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार, क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपआयुक्त मंगला माळवे, भांडार विभागाचे उपआयुक्त अनंत जाधव, सहा. संचालक नगररचना सोमनाथ केकाण, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता सुनील लाड, समाजसेवा अधिकारी सर्जेराव परांडे आणि इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.