सचिन वायकुळे लिखित ‘पत्रकारिता : शोध आणि बोध’ ग्रंथाला सोलापूर विद्यापीठाची मान्यता
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील लेखक सचिन वायकुळे लिखित ‘पत्रकारिता : शोध आणि बोध’ ग्रंथाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाची मान्यता मिळाली आहे. विद्यापीठांतर्गत चालवणाऱ्या जाणाऱ्या ‘सर्टिफिकेट कोर्स इन जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमासाठी अभ्यासग्रंथ म्हणून विद्यापीठाने ही मान्यता दिली आहे.
सोलापूर विद्यापीठात वरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू आहे. या अभ्यासक्रमसाठी आतापर्यंत स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध नव्हता. लेखक वायकुळे यांनी हा अभ्यासक्रम समोर ठेऊन हा ग्रंथ लिहिला आहे. पत्रकारिता आणि जनसंज्ञापन या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी दिलेल्या अभिप्रायास अनुसरून ‘पत्रकारिता : शोध आणि बोध’ हा ग्रंथ विद्यापीठ कौशल्य विकास केंद्रांतंर्गत ‘सर्टिफिकेट कोर्स इन जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन’ अभ्यासक्रमासाठी परिपूर्ण असल्याने हा ग्रंथ अभ्यासक्रमास ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे, असे कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक डॉ. प्र. ना. कोळेकर यांनी दिलेल्या मान्यततेच्या पत्रात म्हटले आहे.