आंदोलनबार्शी

बार्शीचे तहसीलदार शेरखाने यांनी पिकांची पाहणी करून, ई पिक पाहणी अॅपची माहिती दिली

शेतकऱ्याने ई पीक पाहणीची नोंद केली नाही. तर पिक विमा पिक कर्ज दुष्काळ निधी अशा प्रकारच्या निधी भेटणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर पिकाची नोंदणी करणे महत्त्वाचे आहे. (सुनील शेरखाने तहशीलदार बार्शी )

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी तालुक्यांतील मालवंडी येतील शेतकर्याच्या शेतात स्वत बार्शीचे तहशीलदार सुनील शेरखाने यांनी ई पिक पाहणी अॅप डाउनलोड करुण त्यामधे शेतकर्याची अद्ययावत सम्पुर्ण माहिती भरून शेतकरयाना ई पिक पाहणी नोंद कशी करायची याचे मार्गदर्शन केले.

शासन आदेशानुसार सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड करून आपल्या शेतातली माहिती आपणच भरायची “माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पिक पेरा” हा उपक्रम शासनाने 15 ऑगस्ट पासून सुरू केला असून सातबारा उताऱ्यावर पिकाच्या नोंदी करण्यासाठी ई पीक पाहणी ॲप्स लॉन्च केला आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने मोबाईल मध्ये ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड करून आपल्या शेतातली पिकाची नोंदणी आपणच करायची आहे.

बार्शी तालुक्याचे तहसीलदार सुनील शेरखाने यानी स्वतः मालवंडी येथील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन ई पीक पाहणी नोंद कशी करायची याचे मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच हनुमंत होनमाने उपसरपंच विष्णू चव्हाण गाव कामगार तलाठी गणेश मोरे गोरख होनराव कोतवाल बबन चतुर तानाजी कावरे रशीद शेख अमोल गायकवाड बाळू म्हेत्रे आदीजण उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button