रामेश्वर मंदिरात ब्रह्माकुमारीचा होलोग्राफिक शिवलिंग दर्शन थ्रीडी शो भक्तांचा उत्तम प्रतिसाद

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : महाशिवरात्री निमित्त रामेश्वर मंदिर परिसरात ब्रह्माकुमारीज, बार्शी सेवाकेंद्र यांच्या वतीने भव्य दिव्य होलोग्राफिक 3D शिवलिंग दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा तेजस्विनीताई कथले यांच्या हस्ते संपन्न झाले.

या प्रसंगी नगरसेवक नवनाथ माळगे, नगरसेविका शांता नायकोजी, नगरसेविका उर्मिला मुळे, प्रसिद्ध व्यापारी प्रशांतजी कथले तसेच रामेश्वर मंदिराचे ट्रस्टी बसूकाका गाढवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी राजयोग आध्यात्मिक चित्रप्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते. होलोग्राफिक शिवलिंग दर्शनाच्या पाच मिनिटांच्या आकर्षक थ्रीडी शोमध्ये शिवाचे स्वरूप, त्यांचे निवासस्थान, दिव्य कर्तव्य, आत्मा-परमात्म्याचा संबंध तसेच शिवाचे सृष्टीवरील अवतरण याबाबतची माहिती शिवलिंगाच्या पिंडीमध्ये अत्यंत सुंदर व प्रभावी पद्धतीने सादर करण्यात आली.
500000

पहाटे सहा वाजल्यापासूनच हा शो पाहण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. या अनोख्या आध्यात्मिक उपक्रमाचे मंदिराचे विश्वस्त, मान्यवर अतिथी तसेच उपस्थित भक्तगणांनी मनापासून कौतुक केले. ब्रह्माकुमारीजच्या या अभिनव सादरीकरणामुळे भाविकांना अध्यात्मिक ज्ञानासोबतच दिव्य अनुभूती लाभल्याची भावना व्यक्त करण्यात आली.सर्व मान्यवरांनी व भक्तगणांनी राजयोग चित्रप्रदर्शनास भेट देवून राजयोगाबद्दल माहिती समजून घेतली.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या