महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) अध्यक्ष म्हणून विवेक भीमनवार यांचा शपथविधी संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष म्हणून विवेक भीमनवार (भा.प्र.से.) यांनी आज पद व गोपनीयतेची शपथ घेतली. लोकभवन येथे आयोजित समारंभात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना शपथ दिली.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आयोगाचे मावळते अध्यक्ष रजनीश शेठ, तसेच आयोगाचे सदस्य व वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.





