गुळपोळी येथे गणेश मंदिरावर वीज पडून मंदिराचे नुकसान जिवीत हानी नाही

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथे श्रीकांत मचाले यांच्या घराशेजारी खाजगी असलेल्या गणपती मंदिरावरती वीज कोसळली. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट पाऊस धोधो बरसला. गुळपोळी येथील श्रीकांत मचाले यांच्या खाजगी जागेत असलेल्या गणपती मंदिरावरती विजेचा जोरदार आवाज होऊन वीज कोसळली.
मंदिरावरील कोपरे ढासळले आहेत. त्याचबरोबर मंदिराशेजारी असलेल्या जाकीर शेख यांच्या घराची भिंत चिरली आहे. यावेळी आलिशा जाकीर शेख हि त्या घरात होती. आलिशाला किरकोळ दुखापत झाली आहे. ही घटना समजताच तलाठी रावसाहेब देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी कुठलीही जीवित हानी झालेली नाही.