वाशीच्या दादा टकले यांना मिळाली पाच ग्राम सोन्याची अंगठी बक्षिस
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शीच्या कापड बाजारात श्री गणेश वस्त्रदालनात दिपावलीचे औचित्य साधून १६ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२४ या कालावधीसाठी कपडे खरेदीवर ग्राहकांसाठी आकर्षक ऑफरचे आयोजन करण्यात आले आहे. ग्राहकांना ३९९९ रूपयांच्या खरेदीवर स्क्रॅच कार्ड कुपन मिळणार असून सोनेचे ५ ग्राम, १ ग्राम, अर्धा ग्राम व चांदीचे ५ ग्राम,१० ग्राम नाणी बक्षिसे म्हणुन मिळणार आहे. या दिवाळीत आतापर्यंत पाच ग्राहकांना पाच ग्रॅम व दहा ग्रॅम चांदीचे नाणी तसेच सहा ग्राहकांना एक ग्रॅम,अर्धा ग्रॅम ,पाच ग्रॅम अशी सोन्याची नाणी बक्षिसे म्हणून मिळालेली आहेत.
पाच वर्षापूर्वी स्थापना झालेल्या श्री गणेश वस्त्रदालनने बार्शीसह परिसरातील ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. फर्मचे मालक महेश यादव हे दरवर्षी ग्राहकांसाठी दिपावली खरेदीनिमीत्त विविध आकर्षक ऑफर्स देत असतात तसेच लकी ड्रॉचे आयोजन करतात. त्यामुळे अल्पावधीतच त्यांनी अनेक समाधानी ग्राहक जोडलेले आहेत. या वस्त्रदालनात अनेक नामवंत मिलचे कपडे उपलब्ध आहेत. यंदाच्या दिपावलीनिमीत्त लहान मुले, पुरूष व महिलांची दालने आकर्षक व्हरायटी व फ्रेश स्टॉकने सजलेली आहेत.
यंदा दिपावलीनिमीत्त श्री गणेश वस्त्रदालन येथे कपडे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ५ टक्के, १० टक्के, १५ टक्के डिस्काउंट मिळणार आहे. ग्राहकांना ३९९९ रू.च्या कपडे खरेदीवर एक स्क्रॅच कुपन तर त्यापुढे ४ हजाराच्या पटीत म्हणजे ४ हजाराच्या खरेदीवर दोन स्क्रॅच कुपन याप्रमाणे जितक्या रूपयांची खरेदी होईल त्याप्रमाणात कुपन मिळणार आहेत. स्क्रॅच अॅण्ड विन अशा स्वरूपाचे हे लकी ड्रॉ कुपन आहे. ग्राहकांना या दिवाळीत कपडे खरेदीसाठी फ्रेश व आकर्षक नवीन व्हरायटी उपलब्ध असल्याने ग्राहकांनी लवकरात लवकर खरेदी करावी असे आवाहन श्री गणेश वस्त्रदालनचे महेश यादव यांनी केले आहे. त्याचबरोबर श्री गणेश टेलर्स मध्ये ग्राहकांना रेमंड, अरविंद, लिनन मध्ये आदित्य बिर्ला लीलन क्लब असे नामांकित ब्रँडचे शूटिंग, शर्टिंगचे भव्य असे दालन ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध आहे.