निवडणूकबार्शीमहाराष्ट्र

२४६- बार्शी व २४७- मोहोळ विधानसभा मतदार संघासाठी सर्वसाधरण निवडणूक निरीक्षक म्हणून निधी निवेदिता यांची नियुक्ती

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर दि.२९ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता २४६- बार्शी व २४७- मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाकडून निधी निवेदिता (भा.प्र.से.) यांची जनरल निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक कालावधीत मा.सर्वसाधारण निरीक्षक निधी निवेदिता (भा.प्र.से.) यांचे वास्तव्य शासकीय विश्रामगृह, ता.मोहोळ येथे असणार आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्र. ९२२६२३४६२३ हा आहे. नागरिकांना निवडणूक विषयक भेटायचे अथवा माहिती द्यावयाचे असल्यास मा. निरीक्षक यांचे वास्तव असलेल्या शासकीय विश्रामगृह, ता. मोहोळ येथे सायंकाळी ६ ते ७ या वेळेत संपर्क साधता येईल. मा. निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी म्हणून बी.डी. बंडगर, सेक्शन अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर असणार आहेत. संपर्क अधिकारी यांचा भ्रमणध्वनी क्र. ९७६६२७४११८ आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button