निवडणूकबार्शीमहाराष्ट्र

जरांगे पाटलांच्या विचारांचा ध्वज यावेळी विधानसभेवर फडकल्याशिवाय राहणार नाही : आनंद काशीद

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : जरांगे पाटलांच्या खांद्याला खांदा लावून पाच वेळा अमरण उपोषण करणारे आनंद काशीद यांनी अनोख्या पद्धतीने बार्शी विधानसभे करता उमेदवारी अर्ज दाखल केला. डोक्यावर क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची फुले पगडी, गळ्यामध्ये शिव शाहूंचा भगवा, हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हा सर्व विचार समाजामध्ये रुजावा याकरिता आनंद काशीद यांनी बार्शी विधानसभेमध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.

विधानसभा निवडणुकीमध्ये बार्शी तालुक्यातील गरजवंत मराठा समाज त्याचबरोबर सर्व समाज बांधव यावेळी परिवर्तन केल्याशिवाय शांत राहणार नाहीत. गोरगरिबांची लेकरं सुधारण्यासाठी गोरगरिबांचा नेता हवा हा ठाम निर्धार मनामध्ये मतदाराने केलेला आहे त्यामुळे मतदार यावेळी विधानसभेला नवीन चेहरा दिल्याशिवाय शांत राहणार नाहीत तो जरांगे पाटलांच्या विचारांचा म्हणजे गोरगरिबांच्या हिताचे काम करणारा असेल यामध्ये कुठलीही मतदारांमध्ये शंका नाही त्यामुळे सर्व मतदार बार्शी तालुक्यांमध्ये परिवर्तन करण्यासाठी सज्ज आहेत गोरगरिबांनीच मला उमेदवारी अर्ज भरण्याकरता प्रवृत्त केल्यामुळे मी उमेदवारी अर्ज दाखल करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button