गुळपोळीच्या श्री भैरवनाथ यात्रेला मंगळवार पासून प्रारंभ
शुध्द चैत्र पोर्णिमेला श्री भैरवनाथ देवाच्या यात्रेला सुरवात
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यातील गुळपोळी येथे एप्रिल महिन्यात म्हणजे शुध्द चैत्र पोर्णिमेला अर्थात हनुमान जयंतीला गुळपोळी येथे श्री भैरवनाथ (जोगेश्वरी) यात्रेला मंगळवार पासून प्रारंभ होणार आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातुन आणि महाराष्ट्रात तीर्थक्षत्र म्हणून गुळपोळी या गावाला ओळखले जाते. श्री भैरवनाथाचा आवतार महादेवाचा आहे.
बऱ्याच काळापासून गुळपोळीत यात्रा भरली जाते. अतिशय सुंदर पध्दतीने यात्रा पार पाडली जाते दर रविवारी सायंकाळी भैरवनाथ मंदिरात महाआरती केली जाते. त्याच बरोबर महाप्रसाद वाटप असतो. चैत्र शुध्द व्द|हाशीला देव गावा बाहेर नऊ दिवस घटस्थापना केली जाते.
चैत्र पोर्णिमेला दिवशी मध्य रात्रि पासून श्री भैरवनाथ देवाला पुरण पोळीचा नैवद्य देऊन त्यावेळेपासून यात्रेला प्रांरभ होतो. 23 तारखेला धडाकेबाज ऑर्केस्ट्रा , 26 तारखेला रॉयल ऑर्केस्ट्रा कोल्हापूर , विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 9 वाजता गुळाच्या शेरणी देवास निहिण्यास सुरुवात होते. ते दिवसभर चालू असतात. गाजत भैरवनाथची काठी घेऊन शेरण्या निहिल्या जातात. सायंकाळी आरती भैरवनाथाची केली जाते. त्यावेळी गावातील भाविक ग्रामस्थ बाहेर गांवाहुन आलेले लोक आरतीसाठी उपस्थित मोठया संख्येने भैरवनाथ मंदिरात असतात. अनेक दिवसांपासून दररोज आरती श्री भैरवनाथ मंदिरात केली जाते. सध्या दररोज मंदिरात महाप्रसाद वाटप केला जातो. प्रसाद घेण्यासाठी मंदिरात भाविक भक्तांची मोठी गर्दी असते.