बार्शीची नात ठरली ‘लिटल मिस इंडिया २०२४’ ची मानकरी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : मॉडलिंग विश्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या संदीप धर्मा रनवे हाऊस आयोजित ‘लिटल मिस इंडिया २०२४’ या स्पर्धेमध्ये अनिका दर्शन सोमाणी (वय ५ वर्षे) हिने द्वितीय क्रमांक मिळवून व्यावसायिक मॉडलिंग विश्वात आपले नाव कोरले आहे. अनिका ही बार्शीकन्या सीए शिल्पा सोमाणी यांची कन्या तर बार्शीतील सीए श्री. बी.पी. जाजू यांची नात आहे.

पुणे येथील फिनिक्स मॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत देशभरातून २१० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. त्यातील केवळ २२ स्पर्धक हे अंतिम फेरीपर्यंत पोचू शकले. त्यामध्ये अनिका ही द्वितीय विजेती ठरली.

लहान मुलांसाठी भारतातील पहिली राष्ट्रीय स्तरावरील सौंदर्य स्पर्धा, ‘लिटिल मिस इंडिया’ चे आयोजन करणारी ‘संदीप धर्मा रनवे हाऊस’ ही भारतातील अग्रगण्य मॉडेलिंग एजन्सी आहे. या संस्थेकडून ‘लिटल मिस इंडिया’ या लहान मुलांच्या सौन्दर्य स्पर्धेची सन २०१८ पासून सुरुवात करण्यात आली आहे. अनिकाने मिळविलेल्या या यशामुळे बार्शीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्या या यशासाठी सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या