मुला व मुलींच्या गुणांना वाव देण्यासाठी क्रिकेट उन्हाळी प्रशिक्षण शिबीर 2024 चे आयोजन
फिनिक्स क्रिकेट अकॅडमीच्या वतीने उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : उन्हाळ्याच्या सुट्टीच्या काळात बार्शी शहर व परिसरातील खेळाडूंच्या गुणांना वाव देण्यासाठी येथील भगवंत क्रिकेट असोसिएशन संचलित फिनिक्स क्रिकेट अकॅडमी तर्फे 4 ते 19 वर्षे गटातील मुले व मुलींसाठी उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सदर शिबिराचा कालावधी हा 18 एप्रिल ते 5 जून 2024 पर्यंत असणार आहे.
सदर उन्हाळी प्रशिक्षण शिबिरामध्ये सोलापूर तसेच पुणे येथील 8 नामवंत खेळाडू व प्रशिक्षकांकडून तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेण्याची संधी प्रशिक्षणार्थींना मिळणार असून याचा लाभ जास्तीत जास्त खेळाडूंनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
भगवंत क्रिकेट असोसिएशन संचलित फिनिक्स क्रिकेट अकॅडमी ही मुले व मुलींना अत्याधुनिक व तंत्रशुद्ध क्रिकेट प्रशिक्षण देणारी तालुकास्तरावरील एकमेव प्रशिक्षण संस्था आहे. येथे प्रशिक्षणार्थींना सराव करण्यासाठी आधुनिक आर्टिफिशियल टॅर्फच्या दोन खेळपट्ट्या तसेच ऑटोमॅटिक बॉलिंग मशीन द्वारे प्रशिक्षण दिले जाते.
उन्हाळी प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने दर रविवारी एक सराव सामना तसेच आठवड्यातून एक वेळा स्विमिंग सेशन घेतले जाणार आहे. शिबिर काळात प्रत्येक प्रशिक्षणार्थीस एक टूर सामना खेळण्याची संधी दिली जाणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक प्रशिक्षणार्थीस प्रशिक्षण संपविल्यानंतर ट्रॉफी व सर्टिफिकेट प्रदान केले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी गोविंदा भिसे 9405358958 या मोबाईल नंबर वरती आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.