गुळपोळी येथे महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून महामानवाला अभिवादन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : विश्वभूषण, प्रज्ञासूर्य, महामानव, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सूरज भालेराव प्रमुख पाहुणे नितीन साठे प्रमुख उपस्थित बाळकृष्ण पिसे हे होते. प्रमुख पाहुणे नितीन साठे, सूरज भालेराव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळा गळात पोहचले पाहिजे, शिका , संघटित व्हा , संघर्ष करा आशा संदेश दिला. बाबासाहेबानी सर्व घटकासाठी कार्य केले. आजच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. भीम जयंती ही विचारांची साजरी झाली पाहिजे. आपल्या देशाला मोठी राज्यघटना दिली असे संस्थेचे अध्यक्ष बोलत होते. विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ चौधरी उपाध्यक्ष रणजीत चौधरी, किरण खुरंगळे, समाधान चौधरी, गुलाब शेख , बाळकृष्ण पिसे , कमेश चौधरी, राजेंद्र भोसले, अविनाश चौधरी इतर मान्यवर होते. कार्यक्रमाची प्रस्तावना महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन किरण खुरंगळे तर अभारप्रदर्शन रणजीत चौधरी यांनी केले.